अभिषेक बच्चन कोरोना निगेटिव्ह, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

मुंबई, दि. ८ ऑगस्ट २०२०: बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन व त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन या दोघांनाही ११ जुलै रोजी  कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांच्या घरातील इतरांना देखील कोरोनाची लागण झाली होती. दरम्यानच्या काळामध्ये अमिताभ बच्चन २६ जुलै रोजी कोरोना मुक्त झाले होते. त्यांच्या पाठोपाठ आता त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन देखील आज कोरोना मुक्त झाला आहे. त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

११ जुलै रोजी अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन या दोघांनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता दोघेही पितापुत्र कोरोना निगेटिव्ह झाले आहेत. अभिषेक बच्चन यांनी आपल्या कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्याचे ट्विटरवर सांगितले आहे.

अभिषेक बच्चन आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत की, “एक वचन हे एक वचनच असते. आज माझी करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मी तुम्हा सगळ्यांना सांगितले होते मी करोनावर मात करेन. तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांची केलेल्या काळजीसाठी मनापासून धन्यवाद. नानावटी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका यांनी माझ्यासाठी जे काही केले त्यासाठी मनापासून त्यांचे आभार”, तब्बल २८ दिवस कोरोनाशी लढा देऊन अभिषेक बच्चन आज बरे होऊन घरी परतले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा