बारामतीत गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस दुधाचा अभिषेक

बारामती, दि. २८ जून २०२०: बारामती भाजपचे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा अभिषेक घातला तसेच पडळकर यांना समर्थन देत जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी पंढरपुर येथे आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राज्यभरातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून गोपीचंद पडळकर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

उंडवडी येथे आज रविवार दि २८ भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस उंडवडी येथे दुधाचा अभिषेक घालत त्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या तसेच “आय सपोर्ट गोपीचंद पडळकर’ अशा घोषणा दिल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांना समर्थन व्यक्त करण्याचा प्रयत्न केला.

या नंतर भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना तालुका पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती.नंतर राज्यासह बारामती तालुक्यात देखील पडळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत त्यांचे पुतळे जाळले होते.या पार्श्वभूमीवर बारामतीत भाजप कार्यकर्त्यांनी बारामती शहरात त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती. भविष्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे वाकयुद्ध पाहायला मिळणार आहे. आज तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, शहराध्यक्ष सतीश फाळके, जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांच्यासह गोविंद देवकाते, ऍड. ज्ञानेश्वर माने,युवामोर्चा उपाध्यक्ष जयराज बागल, विशाल कोकरे, प्रकाश मोरे, प्रमोद खराडे, भाऊसाहेब मोरे व इतर कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा