गोल पोस्ट राष्ट्रीय गुजरातमध्ये प्रवासी मजुरांच्या गर्दीत एबीपी अस्मिताच्या पत्रकाराला मारहाण

गुजरातमध्ये प्रवासी मजुरांच्या गर्दीत एबीपी अस्मिताच्या पत्रकाराला मारहाण

गुजरात, दि.१९ मे २०२०: सध्या लॉकडाऊनमुळे परप्रांतीय कामगार आपल्या गावाकडे जातांना दिसत आहेत. कुठल्याही गोष्टीचा विचार न करता पायी किंवा मिळेल त्या वाहनाने आपल्या गावी जात आहे. त्यातच गुजरात मधील राजकोट जिल्ह्याच्या सापर वेरावल परिसरात परप्रांतीयाच्या गर्दीमधील काही गुंडांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या एका एबीपी अस्मिता वाहिनीच्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला केला .मारहाणीत पत्रकार गंभीर जखमी झाला आहे. 

या घटनेतून परप्रांतीयांनी कायदा सुव्यवस्था राहिलेली नसल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. पोलीस प्रशासनाकडून या गोष्टींची चौकशी होणे गरजेचे आहे. पंतप्रधानांच्या गुजरातमध्ये लोकशाहीचा चौथा आधारस्थंब असलेल्या पत्रकारांवरच जीवघेणा हल्ला झाल्याची घटना ही निषेध व्यक्त करायला लावणारी आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version