कृषी अभ्यासक्रमासंदर्भात कृषीमंत्री दादा भुसे यांना अभाविपचे निवेदन

मालेगाव, १६ ऑगस्ट २०२०: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मालेगावच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांना महाराष्ट्र राज्यातील कृषी अभ्यासक्रमातील विविध शैक्षणिक समस्या संदर्भात आज दिनांक १६ ऑगस्ट रोजी  निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांचे व कृषी महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे ३०% शैक्षणिक शुल्क कमी करण्यात यावे. प्रवेश नोंदणी करीत असतांना एकूण शुल्काच्या जास्तीत जास्त १५% शुल्क आकारण्यात यावे व उर्वरित शुल्क हे चार टप्प्यात घेण्यात यावे. अंतिम वर्ष वगळता ज्या वर्षाच्या परीक्षा झाल्या नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना परत करावे, अशा मागण्या या निवेदनाद्वारे अभाविपने केल्या.

निवेदन देते वेळी अभाविपचे मालेगाव शहर विस्तारक सचिन लांबूटे व शहर मंत्री कामेश गायकवाड, शुभम लोंढे उपस्थित होते.

न्यूजअनकट प्रतिनिधी – प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा