कॉरोनाच्या संकटात ‘अभाविप’चे पुणे शहरात लसीकरण नोंदणी अभियान

पुणे, ०५ एप्रिल २०२१ : गेल्या वर्षभरापासून देशभरात कॉरोना नामक महामारी ने थैमान घातले आहे आणि या दरम्यान देशाला ‘लॉकडाऊन’ सारख्या कडक निर्बंधांना ही सामोरे जावे लागले होते. आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सध्याची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. हजारो नवीन रुग्ण दिवसाला वाढत आहेत, अनेक गंभीर अवस्थेतील रुग्णांना ‘प्लाझ्मा’ ची आवश्यकता निर्माण होत आहे आणि कॉविड मधून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दानासाठी समोर  येण्याचे आव्हान अभाविपच्या ‘ रक्त मित्र ‘ कडून केले जात आहे.
कॉरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या हेतूने प्रत्येक नागरिकाने जबाबदारी ने काळजी घेऊन सध्या देशभरात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत सहभागी झाले पाहिजे आणि यातच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या वतीने कॉविडच्या या संकटकाळात विविध सेवाकार्य,  जनजागृती व कॉविड लसीकरण नोंदणी मोहिमेला सुरुवात केली आहे, याच्या माध्यमातून कॉविड लसीकरण विषयात कार्यकर्ते पुणे शहरात जनजागृती करत आहेत व नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करून देत आहेत, तसेच अनेक रुग्णांना रक्तदान व ‘प्लाझ्मा’ ची आवश्यकता येत असताना या रुग्णांना प्लाझ्मा मिळवून देण्यासाठी देखील अभाविपचे ‘रक्त मित्र’ कार्यरत आहे.
” कॉविड चा प्रादुर्भाव वाढत असतांना नागरिकांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी त्वरित लसीकरण करावे म्हणून ‘अभाविप’ च्या द्वारे पुणे शहरात १०० लसीकरण नोंदणी शिबीराची योजना करून पुण्यातील एक लाख नागरिकांना लसीकरण करण्यासाठी जनजागृती करत आहोत, तसेच ‘रक्त मित्र’ द्वारे ‘प्लाझ्मा’ दानासाठी प्रयत्न करत आहोत” अशी माहिती अभाविप पुणे महानगर मंत्री शुभम भुतकर यांनी दिली.
गेल्या ‘लॉकडाऊन’ पासून सतत आरोग्य शिबीर, थर्मल स्क्रिनिंग, विद्यार्थी आणि श्रमिकांना राशन, भोजन आणि घरी जाण्याची व्यवस्था, वस्तीभागात ‘परिषद की पाठशाळा’ उपक्रमातून शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षण आणि स्टेशनरी व्यवस्था केली आणि आता या दुसऱ्या लाटेत लसीकरण नोंदणी अभियान व रुग्णांना ‘प्लाझ्मा’ मिळवून द्यायचे काम अभाविप कार्यकर्ते करत आहेत अशी माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पुणे महानगर मंत्री शुभम भुतकर यांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा