गोल पोस्ट महाराष्ट्र अलिबागच्या कार्लेखिंडीत अपघात, ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

अलिबागच्या कार्लेखिंडीत अपघात, ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

अलिबाग, रायगड ४ मार्च २०२३ : अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंड येथे दुचाकीचा अपघात झाला असून या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे. विनायक पाटील (३०) रा. मुरबाड असे मृत व्यक्तिचे नाव आहे.

हा दुचाकीस्वार हा रात्री १२.३० च्या सुमारास ठाणे येथुन अलिबागकडे येण्यास निघाला होता. त्यानंतर पहाटे अलिबाग जवळील कार्लेखिंड आले असता त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिक पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोयनाड पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : दत्तात्रय शेडगे

error: Content is protected !!
Exit mobile version