गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा महिलादिनानिमित्त महाडमधील आदिवासी वाडीतील महिलांना गृहउपयोगी वस्तूंचे वाटप

महिलादिनानिमित्त महाडमधील आदिवासी वाडीतील महिलांना गृहउपयोगी वस्तूंचे वाटप

महाड, ४ मार्च २०२४: महाडमधील कुंभार आळी महिला मंडळातर्फे महिला दिनानिमित्त अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत महाडमधील दुर्गम भागातील २ आदिवासी वाड्यांमधील गरजू महिला व लहान मुलांना गृहउपयोगी वस्तू, कपडे, खेळणी व खाऊचे वाटप करण्यात आले. महाडमधील म्होप्रे ज्ञानेश्वर आदिवासी वाडी व चांभारखिंड आदिवासी वाडी या दोन्ही वाड्यांमध्ये मिळून एकूण ३६ घरे होती या या घरातील महिलांना भेट देऊन त्यांना गृहउपयोगी वस्तूंचे वाटप केले गेले. यामध्ये तेल, साबण,साखर,पोहे इ. त्याच बरोबर साडी, ड्रेसलहान मुलांसाठी कपडे, खेळणी, खाऊ या वस्तूंचे वाटप करण्यात आले. अशाप्रकारचे समाजकार्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन महाडमधील कुंभार आळी महिला मंडळाकडून करण्यात आले.

प्रतिनिधी – कृपा सपकाळ.

error: Content is protected !!
Exit mobile version