सेरो सर्वेक्षणात मुंबईतील ५०% मुलांना कोरोनाचा संसर्ग, मुख्यत: १० ते १४ वर्षे वयोगटातील मुलं

मुंबई, २९ जून २०२१: तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. इथल्या जवळपास ५०% मुलांमध्ये अँटीबॉडीज सापडले आहेत. सोमवारी आलेल्या बीएमसीच्या चौथ्या सेरो सर्व्हेच्या अहवालात हा खुलासा करण्यात आलाय.

अहवालानुसार ज्या मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळले आहेत त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तज्ज्ञांच्या मते, ही एक दिलासा देणारी बाब आहे. अँटीबॉडीज तयार झाल्यामुळं, तिसऱ्या लाटेत या मुलांमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका कमी झालाय. सर्वेक्षणानुसार, १० ते १४ वर्षे वयोगटातील ५३.४३% मुलांना संसर्ग झालाय.

२४ प्रभागातील २,१७६ मुलांचा घेतला नमुना

बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) च्या आदेशानुसार मुंबईतील बीवायएल नायर हॉस्पिटल व कस्तुरबा मोलिक्युलर डायग्नोस्टि १ एप्रिल २०२१ ते १५ जून २०२१ या काळात चौथे सेरो सर्वेक्षण केले गेले. या सर्वेक्षणात १८ वर्षांखालील एकूण २,१७६ मुलांचा समावेश होता.

मुंबईच्या एकूण २४ वॉर्डांमध्ये केलेल्या या सर्वेक्षणात असं दिसून आलं की पूर्वीच्या तुलनेत मुलांमध्ये अँटीबॉडीज वाढले आहेत. सर्वेक्षण करण्यासाठी, नमुने १-४, ५-९, १०-१४ आणि १५-१८ वयोगटात विभागले गेले. सर्वेक्षणात असं दिसून आलंय की, १० ते १४ वर्षे वयोगटातील ५३.४३% मुलांना सर्वात जास्त संसर्ग झालाय. अहवालानुसार, सेरो सर्वेक्षणात एकूण सकारात्मकतेचं प्रमाण ५१.१८% आढळलंय.

महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार २,१७६ नमुन्यांपैकी १,२८३ हे नायर हॉस्पिटलच्या आप्ली चिकीत्सा नेटवर्क व कस्तुरबा मोलिक्युलर डायग्नोस्टिकतून ८८३ नमुने गोळा केले गेले.

सर्वेक्षण मुख्य मुद्दे

• ५०% मुलांमध्ये अँटीबॉडी आढळले.

• ५१% सकारात्मकता दर मिळाला.

• १० ते १४ वयोगटातील मुलांना सर्वात जास्त ५३.३३ टक्के संक्रमण झालं.

• १ ते ४ वर्षे वयोगटातील ५१.०४% मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळले आहेत.

• ५ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये हा आकडा ४७.३३% होता.

• १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये ५१.३९% अँटीबॉडीज आढळले आहेत.

• १ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये ५१.१८% सेरो पॉझिटिव्हिटी आढळलीय.

• तिसर्‍या सेरो सर्वेक्षणात १८ वर्षाखालील ३९.४% मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळले.

तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेता, सर्वेक्षणात आरोग्य शिक्षणावर आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या उपायांवर भर देण्यास सांगितलंय. यासाठी सोशल मीडियाच्या वापरावरही भर देण्यात आलाय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा