बारामती, दि. ३० मे २०२०: बारामती येथील पेन्सिल चौकातील एस.बी.आय बँकेजवळ व्हाट्सअप वर चुकून आलेल्या एसएमएस वरून बारा ते तेरा जणांच्या जमावाने दोघांना तलवारीने व लाथा बुक्क्यानी बेदम मारहाण करून घड्याळ व सोन्याच्या अंगठी काढून घेतल्या या प्रकरणी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संध्या आरोपी फरार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक महेश विधाते यांनी दिली.
बारामती एमआयडीसी येथील बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी फिर्यादी सुखदेव धोंडीबा हिवरकर, वय ४३ वर्षे, व्यवसाय शेती. रा. शिर्सुफळ,( ता. बारामती ) यांनी आरोपी विकास चंदनशिवे, रा. मळद( ता.बारामती ) बापू मळेकर, पुर्ण नाव पत्ता माहीत नाही, टेक्या पवार, पुर्ण नाव पत्ता माहीत नाही यांच्या विरूध्द फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार (दि.२९ ) रोजी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास गावातील संतोष मगन आटोळे उर्फ मामू यास फोन करून त्याचा भाऊ मनोज याचा मोबाईल नंबर मागीतला होता व त्याने तो थोडया वेळात पाठवितो असे सांगून त्यांनी फोन बंद केला. त्यानंतर संध्याकाळपर्यंत मामूने नंबर न पाठविल्याने फिर्यादी रात्री, ८ वाजण्याच्या सुमारास जेवण करीत असताना पुन्हा मामू यास नंबर घेण्यासाठी फोन केला असता त्याने फोन कट केला. तेव्हा फिर्यादीने मोबाईलवरून त्याचे व्हॉटस्अँपवर फोन नंबर द्या असा मेसेज पाठवित असताना तो मोबाईलमध्ये मुन्ना नावाने सेव्ह असलेल्या विकास चंदनशिवे याच्या मोबाईल नंबरवर चुकून सेंड झाला.
त्यावरून फिर्यादी व आरोपी यांच्यात वादविवाद होऊन आरोपीने शिवीगाळ करत तू आत्ताच्या आत्ता एम.आय.डी.सी. चौकात ये, तु नाही आला तर, तूझ्या घरी येवून खून करेन, असे म्हणाले असता रस्त्यात येताना ओळखीचे राजेंद्र बनकर यांना फोन करून झालेल्या घटनेबाबत सांगीतले. तेव्हा ते ही सोबत माझे गाडीत एस.बी.आय. बँकेसमोर एम. आय, डी. बारामती येथे साधरण दहा वाजण्याच्या सुमारास आले .
त्यावेळी तेथे अगोदरच दोन पांढ-या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडी तसेच यामाहा व बुलेट उभ्या होत्या. त्यावेळी फिर्यादी गाड़ीतून उतरले . तेव्हा दोन्ही चार चाकी वाहनातून फिर्यादी ओळखत असलेले विकास चंदनशिवे, रा. मळद, ( ता.बारामती ) बापू मळेकर, तसेच त्यांचे सोबत इतर १० ते १२ अनोळखी इसम अचानक अंगावर धावून आले. त्यातील बापू मळेकर याने राजेंद्र बनकर यांना हाताने मारहाण करून झुडपात ढकलून दिले. त्यानंतर ते सर्वजण फिर्यादीच्या अंगावर धावून गेले. त्या सर्वांनी जमीनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
त्याचवेळी बापू मळेकर हा त्यांच्यातील एकास म्हणाला की, टेक्या पवार याला हाणं , त्यावेळी त्याने त्याचे हातातील तलवार घेवून फिर्यादीच्या अंगावर आला. तो ती तलवार मारत असताना राजेंद्र बनकर यांनी फिर्यादीला बाजूला ढकलून दिल्याने तलवार जमीनीवर पडली. त्याचवेळी इतर मारहाण करणाऱ्या लोकांनी फिर्यादीस पकडले व इसम बापू मळेकर व विकास चंदनशिवे यांनी फिर्यादीच्या उजव्या हातातील दोन सोन्याच्या अंगठया व डावे हातातील टायटन कंपनीचे घडयाळ हिस्कावून घेतले.
दरम्यान विकास चंदनशिवे व बापू मळेकर हे कोणाशी तरी फोनवर संपर्क करीत होते. सदरचा गोंधळ चालू असताना समोरच असलेल्या पोलीस स्टेशनमधून दोन पोलीस धावत त्या ठिकाणी आले तेव्हा पोलीसांना पाहून मारहाण करणारे लोक दोन पांढ-या रंगाच्या स्कॉर्पियो, यामाहा व बुलेट मोटारसायकलवरून एम.आय.डी.सी. दिशेने पळूण गेले. पोलीसांनी त्यांचा पाठलाग केला असता सर्व आरोपी फरार झाले.
४० हजार रुपये किमतीचीे सव्वा तोळ्याची सोन्याची अंगठी, ४० हजार रुपये किमतीची एक साधारण सव्वा तोळ्याची सोन्याची अंगठी, ७ हजार रुपये किमतीचे एक टायटन कंपनीचे गोल्डन रंगाचे मनगटी घडयाळ असे ८८ हजार रुपये किमतीचा ऐवज काढून घेतला आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक महेश विधाते हे अधिक तपास करीत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव