गोल पोस्ट गुन्हा दोन वर्षांपासून फरार आरोपी आज अटकेत

दोन वर्षांपासून फरार आरोपी आज अटकेत

उस्मानाबाद, दि. २८ जून २०२०: पोलीस ठाणे तुळजापूर येथील गु.र.क्र. २८६/२०१८ या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी गेली दोन वर्षे पोलीसांना गुंगारा देत होता. तुळजापूर तालुक्यातील मातंगनगर येथील विनायक शंकर पौळ वय वर्षे २४ ह्या संबंधित आरोपीला काल दिनांक २७ जून रोजी, स्था.गु.शा.च्या पथकाने ताब्यात घेतले.

स्था.गु.शा. च्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांना या आरोपीस पकडण्यात यश आले. तरी, पुढील तपास कामी त्यांनी आरोपीला पोलीस ठाणे तुळजापूरच्या ताब्यात दिले आहे.

संबंधित कारवाई गोपनीय माहितीच्या आधारे पो.हे.कॉ. रोकडे, पो.कॉ. पांडुरंग सावंत, बलदेव ठाकुर यांच्या पथकाने स्था.गु.शा. चे पो.नि. श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

error: Content is protected !!
Exit mobile version