गोल पोस्ट इतर राजकारण संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

उस्मानाबाद, दि. २८ जून २०२०: उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भारतीय जनता युवा मोर्च्याने शिवसेनेचे खासदार व दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत, यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला.

दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय सैनिकांबद्दल अपशब्द वापरले होते. बिहार रेजिमेंट शौर्य दाखवत असताना बाकी रेजिमेंट काय तंबाखू चोळत होत्या का’, अशा प्रकारचे सैनिकांबद्दल अपशब्द संजय राऊत यांनी वापरले. अशाप्रकारचे गलिच्छ राजकारण करणाऱ्या व अशा प्रवृत्तीच्या व्यक्तिचा भारतीय जनता युवा मोर्चाने एक तीव्र निषेध केला. संजय राऊत आपण आवश्य राजकारण करा, परंतू भारतीय सैनिकांबद्दल अपशब्द वापरून त्यांचे मनोबल तरी कमी करण्याचा प्रयत्न करू नका, एक भारतीय नागरिक म्हणून अाम्ही कधीही ते सहन करू शकणार नाहीत;असे म्हणत आज छत्रपती शिवाजी महाराज चौक, उस्मानाबाद येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून तीव्र निषेध करण्यात आला.

हे आंदोलन भारतीय जनता युवा मोर्च्या जिल्हा सरचिटणीस राहुल काकडे, गणेश इंगळगी, श्रीराम मुंबरे, प्रवीण शिरसाटे प्रकाश पवार, भगवंत गुंड, कृष्णा कुंभार, तानाजी गोरे, अक्षय भाले, तसेच इतरही कार्यकर्त्यांच्या उपस्थिती मध्ये झाले.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड.

error: Content is protected !!
Exit mobile version