गोल पोस्ट महाराष्ट्र आठ वर्षांपासून शोध असलेल्या आरोपीला अटक

आठ वर्षांपासून शोध असलेल्या आरोपीला अटक

उस्मानाबाद, २५ जून २०२० : वाशी तालुक्यातील पिंपळगाव मधील बबन आबा शिंदे या आरोपीला आज दिनांक २५ जून रोजी स्था. गु. शा. च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. येरमाळा पोलीस ठाणे गु.र.क्र. १४४/ २०१२ या दरोड्याच्या गुन्ह्यातील संबंधित आरोपी बबन आबा शिंदे हा गेली ८ वर्षे पोलीसांना गुंगारा देत असल्याने पोलीसांना त्याचा ठावठिकाणा समजून येत नव्हता.

मात्र, स्था. गु. शा. च्या पथकाने आज दिनांक २५ जून रोजी गोपनीय माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेतले. तसेच उर्वरित तपासाकामी त्याला येरमाळा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.

संबंधित कारवाई स्था. गु. शा चे पोलीस निरीक्षक श्री दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री आशिष खांडेकर, सपोफौ मधुकर घायाळ, पोहेकॉ भागवत झोंबाडे, तानाजी माळी, कवडे, पोना समाधान वाघमारे, यांच्या पथकाने केलेली आहे.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

error: Content is protected !!
Exit mobile version