गोंडा मध्ये तीन दलित मुलींवर अ‍ॅसिड फेकून हल्ला, एकीची प्रकृती चिंताजनक

3

गोंडा, १३ ऑक्टोंबर २०२०: उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सर्व प्रयत्न करूनही महिला आणि मुलींवरील गुन्हेगारी अत्याचार थांबण्याचं नाव घेत नाही. आता नवीन प्रकरण समोर आला आहे जे गोंडा येथील आहे. जेथे सोमवारी रात्री झोपताना तीन दलित मुलींवर अ‍ॅसिड फेकण्यात आलं. तिघी जणींवर ॲसिड फेकलं गेल्यामुळं त्यांची त्वचा जळाली आहे, त्यातील एक जण गंभीर जखमी आहे. अ‍ॅसिड फेकण्याचं कारण अद्याप समजू शकलं नाही.

गोंडामध्ये परसपूर भागातील पसका गावची ही घटना आहे. रामआवतार यांच्या तीन मुलींवर झोपताना ॲसिड टाकण्यात आलं. तिघींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासह पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

रामआवतार यांची मुलगी काजल (१७ वर्षे), महिमा (१२ वर्ष) आणि आठ वर्षांची सोनम दुसर्‍या मजल्यावरील टेरेसवर झोपल्या होत्या. दरम्यान, तिन्ही मुलींवर अ‍ॅसिड फेकण्यात आलं. रात्री साडेअकराच्या सुमारास मोठी मुलगी खुशबू ओरडत खाली आली आणि रामआवतार यांना चिकटून राहिली. यानंतर दोघीही ओरडत खाली आल्या. यात काजलचा चेहरा आणि इतर दोन्ही हात जळाले होते. या घटनेनंतर हे कुटुंब गोंडा जिल्हा रुग्णालयात पोहोचलं.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर काजलची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचं पाशा चौकी प्रभारी उमका वर्मा यांनी सांगितलं. अनेक ठिकाणी शोध सुरू आहे. यासह नजीकच्या काळात ज्या ठिकाणावरून ऍसिडची खरेदी केली गेली होती त्या सर्व ठिकाणी तपास सुरू करण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा