पुणे – सोलापूर महामार्गावर १२६ वाहन चालकांवर कारवाई

हडपसर, दि.६ मे २०२० : देशभर लॉकडाऊन असूनही कामा नसताना फिरणाऱ्या ७३, तर आज (बुधवार) ५३ अशा एकूण १२६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुणे – सोलापूर रस्त्यावर मांजरी फाटा चौक येथे हडपसर वाहतूक पोलिसांनी बुधवारी (दि. ६ ) रोजी ५३ वाहनांवर कारवाई केल्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी सांगितले.

यावेळी कोळी म्हणाले की, मागिल दोन दिवसांत भादंवि १२८, २६९, २७०, २७१ याप्रमाणे चारचाकी- ११, तीनचाकी-६ आणि दुचाकी ५६ अशा एकूण ७३ वाहनांवर कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत. तिसऱ्या टप्प्यात देशभर लॉकडाऊन असून, रेडझोनमध्ये डबल, ट्रिपल सीट फिरणाऱ्या दुचाकीचालकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली. ही कारवाई आणखी कडक करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय घरातून बाहेर पडू नये, पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे “न्यूज अनकट” शी बोलताना सांगितले आहे.

वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, सहायक पोलीस आयुक्त नागनाथ वाकुडे, यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव म्हेत्रे, पोलीस हवालदार रामदास मेमाणे, सुनील बोरकर, अंकुश शिवणकर, तेज भोसले, मनोज ठाकरे, दिनेश टपके, रामदास चिंचकर, अतुल साळवे, सचिन लांडगे, कैलास सपकाळ, शरद पाटील, संतोष कदम, संतोष आढाव आणि महिला पोलीस नाईक सुजाता कुंजीर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा