कश्मीर मधील आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई, अमेरिकन मेड रायफल जप्त

जम्मू काश्मीर, ७ सप्टेंबर २०२०: भारत चीन सीमा विवादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर जम्मू-कश्मीर मध्ये आतंकवाद्यांच्या विरोधात मोहिमा राबवत आहेत. काही दहशतवाद्यांनी कुपवाडा जिल्ह्यातील घनदाट जंगलात घुसखोरी केली असून ते तिथे लपून बसल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली. या माहितीनंतर सैन्याने कुपवाडा जंगलात शोध मोहीम सुरू केली आहे.

शनिवारी सायंकाळपासून सुरू असणाऱ्या शोध मोहिमेदरम्यान सैन्यानं एम -४ रायफल जप्त केली आहे. ही रायफल अमेरिकेन बनवटीची आहे. लष्कराने रायफलसह आणखी काही शस्त्रेही जप्त केली आहेत. घुसखोर आतंकवाद्यांना जो पर्यंत पकडले जात नाही किंवा ठार मारले जात नाही तोपर्यंत कुपवाडाच्या जंगलात सुरू असलेले हे सर्च ऑपरेशन सुरूच राहणार असल्याचे सैन्याने सांगितले आहे.

सैन्याच्या १९ डिव्हिजन जीओसीचे मेजर जनरल वीरेंद्र वत्स म्हणाले आहेत की हिवाळा सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानकडून दहशतवादी घुसखोरीचे प्रयत्नही वाढू शकतात. सैन्यही याबाबत सावध आहे. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवरील (सीओसी) युद्धबंदीचे उल्लंघन करण्याबाबत ते म्हणाले की सैन्य प्रत्येक कारवाईला चोख प्रत्युत्तर देत आहे.

लडाखमध्ये चीनबरोबर सुरू असलेल्या तणावामुळे नियंत्रण रेषेवरील सैन्यांची संख्या कमी झाली असती हे पाकिस्तानला कदाचित समजले आहे, असेही लष्कराचे म्हणणे आहे. पाकिस्तान हे विसरत आहे की चीनशी तणाव असूनही नियंत्रण रेषेवरील सुरक्षेत कोणतीही कपात होणार नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा