अमरावतीमध्ये ‘जंगल धाम’ मधील बिबट्यांचा ‘मंगल धाम’ सोसायटीमध्ये प्रवेश, मानवी हस्तक्षेप वाढल्याने प्राण्यांची लोकवस्तीकडे धाव

अमरावती ५ नोव्हेंबर २०२३ : अमरावती शहरालगतच्या मालखेड जंगलाला अगदी लागुनच होणाऱ्या ‘शिवमहापुराण’ आयोजनामूळे या परिसरातील मानवी हस्तक्षेप व यंत्रांची वर्दळ वाढली आहे. ज्याचा परिणाम येथील जंगली प्राण्यांवर होताना दिसत आहे. या भागातील दोन बिबटे ‘मंगल धाम’ परिसरात शिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यामूळे येथील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे.

नविन लोकवस्ती झालेला मंगलधाम हा परिसर जंगलाला लागूनच आहे. मंगलधामच्या शेवटी असलेल्या सावरकर अपार्टमेंट लगतच्या झुडूपामधून हे दोन बिबटे लोकवस्तीमध्ये शिरल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकारानंतर वनविभागाच्या अधिकार्यांना परिसरातील नागरिकांनी निवेदन दिले आहे.

शहरातील मंगलधाम परिसरात शुक्रवारी रात्री दोन बिबट्याचे नागरिकांना दर्शन झाले. सावरकर अपार्टमेंट लगतच्या झुडूपामधून दोन बिबट लोकवस्तीमध्ये प्रवेश करत असल्याचे व्हिडीओ फुटेजही प्राप्त झाले आहे. ज्यामूळे या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. येथील नागरिक आता आपल्या कुटूंबासह सात वाजताच्या आत आपल्या घरात स्वत:ला बंद करुन घेत आहेत. येथील फ्लॅटच्या गॅलरी मधून शुक्रवारी या बिबटांचा व्हिडिओ घेण्यात आला. जो समाज माध्यमांवर वायरल झाला आहे. वनविभागाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : मनिष जगताप

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा