अमरावती मधिल बियाणी चौकात भीषण अपघात, टिप्परच्या धडकेत महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक गंभीर जखमी

अमरावती ५ नोव्हेंबर २०२३ : रविवारी सकाळी अमरावती मधिल कॅम्प येथील बियाणी चौकात ट्रक आणि दुचाकी वाहनात भीषण अपघात घडला. या अपघातात राजापेठ पोलीस स्टेशनच्या ए पी आय प्रियंका कोठेवार, वय ३८,राहणार तपोवन या गंभीर जखमी झाल्या.

ए पी आय प्रियंका कोठेवार सकाळी आपल्या एम एच २७ बी एन ४७१४ क्रमांकाच्या ऍक्टिव्हा दुचाकी राजापेठ पोलीस स्टेशन येथे ड्युटी ला जात असताना, रेती भरून जाणारा टिप्पर क्रमांक एम एच२७ एक्स ८८७१ च्या धडकेत गंभीर जखमी झाल्या. ट्रक आणि दुचाकी तपोवन मार्गाने बियाणी चौक मार्गाने येत होत्या. त्यावेळी ट्रक चपराशी पुरा मार्गावर वळण घेत असताना दुचाकी ला धडक बसून काठेवाडे यांच्या पायावर चाक आल्याने त्यांच्या एक पायाला गंभीर इजा झाली. मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव होत असल्याने नागरिकांनी आणि पोलिसांनी, गंभीर जखमी कोठेवार यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांनी धाव घेऊन ट्रक चालकाला ताब्यात घेतले. अपघात स्थळ बियाणी चौकात पंचनामा करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. विशेष म्हणजे मार्डी तें विद्यापीठ आणि बियाणी चौक मार्गाने दररोज गौण खनिज घेऊन शेकडो ट्रक येजा करीत असतात, मात्र त्यांची चौकशी करण्याचा पोलिसांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे

न्यूज अनकट प्रतिनिधी : मनिष जगताप

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा