रस्त्यांना खड्ड्यात घालणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई? पुणे महापालिका प्रति खड्डा पाच हजार रुपयांचा दंड ठोठावणार

पुणे, २८ जूलै २०२२: शहरातील रस्त्यांना खड्ड्यात घालण्यास जबाबदार असणाऱ्या ठेकेदारांना आता त्याची किंमत मोजावी लागणार आहे. डिफेक्ट लायबिलिटी पिरियड अर्थात डीएलपी ज्या रस्त्यांना खड्डे पडले आहेत, त्यासाठी ठेकेदारांकडून प्रति खड्डा पाच हजारांचा दंड पुणे महापालिका वसूल करणार आहे.

हा निर्णय मुख्य खात्यासह क्षेत्रीय कार्यालयस्तरावर काम केलेल्या प्रत्येक ठेकेदाराला लागू असेल, पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करुन तेथे सिमेंट काँक्रिट तसेच डांबर टाकून रस्ते दुरुस्त करण्यात आले होते. मात्र जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात या निकृष्ट कामांची पोलखोल झाली

पहिल्याच पावसाने शहरातील रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. मुख्य खात्याकडील १३९ रस्तेही ‘डीएलपी’ मधील आहेत, त्यातील ११ ठेकेदारांनी केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्याचे स्पष्ट झाले आहे. डिएलपी मधील रस्ते निकृष्ट दर्जाचे झाल्याने संबंधित ठेकेदारांवर कारवाई होणार आहे.

त्यानूसार प्रति खड्डा पाच हजार रुपयांचा दंड घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील पाच हजार खड्डे बुजविण्यावर महापालिकेचा आत्तापर्यत सुमारे अडीच कोठी रुपयांचा खर्च झाला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा