पालिकेच्या वाहनांवर परिवहन विभागाची कारवाई

बारामती ,४ नोव्हेंबर २०२० : बारामती नगर पालिकेच्या कचरा गाड्यांवर आज दि.४ बुधवारी सकाळी नऊ वाजता गाड्यांवर पहिली खेप टाकायला आल्यावर तपासणी करत धडक कारवाई करत परिवहन विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे.बारामती नगर पालिका ही ‘अ’ वर्ग नगर पालीका असून कचरा गाड्यांसाठी वेगळा विभाग नसुन आरोग्य विभागाचे कर्मचारीच वाहनांचे सर्व कामकाज बघत आहेत.

बारामती नगर पालिकेच्या वाहनांवर आज सकाळी परिवहन विभागाने दंडात्मक कारवाई केली यामध्ये वाहनांना १२०० रुपयांपासून ते ९५०० रुपयांपर्यंत दंडाच्या पावत्या देण्यात आल्या आहेत.गाड्यांचे प्रदूषण परवाना , रेडियम , गाडीला इंडिकेटर काही गाड्यांचे पासिंग नाही पालिकेकडे सध्या कचऱ्याच्या घंटा गाड्यामध्ये छोटा हत्ती २९ , ट्रॅक्टर ३ , जेसीबी १ , ४०७ टेम्पो १ , ट्रॅक्टर डोजर १ एवढी वाहने आहेत.मात्र सध्या या सर्व वाहनांची देखभाल ही आरोग्य विभागाचे कर्मचारीच वाहनाचे पासिंग , इन्शुरन्स , दुरुस्तीची कामे करत आहेत.

कचरा गाड्या बऱ्याच वेळा प्रमाणापेक्षा जास्त भरलेल्या असतात त्यामुळे वाहनाचे इंडिकेटर सुरू असणे महत्वाचे आहे.अन्यथा मागून आलेल्या वाहनाला अंदाज न आल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.त्यासाठी परिवहन विभागाच्या नियमांप्रमाणे वाहन सर्व सोईनयुक्त असणे गरजेचे आहे.

घंटागाडी या शहरातील गल्ली बोळात जाऊन कचरा गोळा करत असतात यावेळी जास्त महिला ,वृद्ध ,लहान मुलं असतात यांना देखील धोका होऊ शकतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा