सिंधुदुर्गमध्ये अनधिकृत वॉटर स्पोर्ट्सवर कारवाई

सिंधुदुर्ग, २० नोव्हेंबर २०२० : राज्य सरकारने वॉटरस्पोर्ट्सला परवानगी दिलेली नसली तरी वाढत्या पर्यटकांसाठी सिंधुदुर्गच्या मालवण किनारपट्टीवर व्यावसायिकांनी वॉटर स्पोर्ट्स सुरू केले होते. या अनधिकृत वॉटर स्पोर्ट्सवर बंदर विभागाने आज कारवाई केली. त्यामुळे संतप्त व्यावसायिकांनी आक्रमक पवित्रा घेत ही कारवाई न थांबल्यास समुद्रात उपोषणाचा इशारा दिला आहे.

दरम्यान, आमदार वैभव नाईक यांनी मालवणात दाखल होत पर्यटन व्यावसायिकांची मागणी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मांडली आहे. कोरोना विषयक नियमांच्या अटीशर्तीसह वॉटर स्पोर्ट्स व्यवसायाला परवानगी द्यावी, अशी भूमिका बंदर विभागाचे मुख्य अधिकारी आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडे दूरध्वनीवरून मांडली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सचिवांनाही याबाबत माहिती देण्यात आली असून उद्या सकाळपर्यंत परवानगी मिळेल. असं आमदार वैभव नाईक यांनी सांगितलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा