‘द केरला स्टोरी’ वरून जम्मू मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात गोंधळ, गोंधळ घालणाऱ्या १० विद्यार्थ्यांवर कारवाई

जम्मू काश्मीर, १६ मे २०२३: रविवारी ‘द केरला स्टोरी’ वरून झालेल्या भांडणानंतर जम्मूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयतील (जीएमसीएच) दहा विद्यार्थ्यांना दोन महिन्यांसाठी वसतिगृहातुन काढून टाकण्यात आले आहे. रविवारी झालेल्या हाणामारीत पाच विद्यार्थि जखमी झाले होते. तर त्यापैकी एकाच्या डोक्याला दुखापत झाली होती.

गोंधळ घालणाऱ्या १० विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली असताना त्यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना महाविद्यालयतील जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. या घटनेनंतर मेडिकल कॉलेजचे प्राचार्य शशी सुधन शर्मा यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्ताची मागणी केली आहे.

जखमींमध्ये चार विद्यार्थी जम्मू-काश्मीरचे असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, डोक्याला दुखापत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव हसीब असे आहे. तर अरुणेश, अक्षित, अनिकेत आणि उमर फारुख हे चौघे किरकोळ जखमी झाले आहेत.

विद्यार्थ्यांनी सांगितले की, एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ‘द केरला स्टोरी’ला चांगला चित्रपट म्हणून वर्णन केले आणि त्यामुळे या चित्रपटावरून दोन गटांमध्ये वाद वाढला. हा ग्रुप फक्त कॉलेजशी संबंधित अपडेट्स पोस्ट करण्यासाठी वापरला जातो. मात्र, ज्या विद्यार्थ्याने ग्रुपमध्ये चित्रपटाचे कौतुक केले होते, त्याने वसतिगृहत विरोध करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. भांडणानंतर वसतिगृहात गोंधळ वाढल्यामुळे काही बाहेरचे लोकही वसतिगृहात आले आणि दोन गटात हाणामारी सुरू झाली.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा