वंचितच्या ऊसतोड कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक

पुणे, २७ ऑक्टोबर २०२०: आज पुण्यात वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये साखर आयुक्तांची उसाच्या भाववाढी संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी ऊस कामगार, मुकादम, वाहतूकदार यांच्यासाठी लढा देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे ऊसतोड कामगार संघटनेचे प्रतिनिधी आणि प्रदेश अध्यक्ष प्रा. शिवराज बांगर यांना पोलिसांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह अटक केली आहे. व त्यांना अज्ञात स्थळी नेण्यात आले आहे.

या बैठकीला विनायक मेटे, भाजपा आमदार सुरेश धस यांनाही निमंत्रण नव्हते मात्र, त्यांना ऐनवेळी प्रवेश देण्यात आला व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना बैठकीला जाण्यापासून रोखण्यात आले.

या विरोधात जाब विचारल्यावर पोलिसांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना अटक केलीय. महाविकास आघाडी सरकारच्या या हुकूमशाही कृत्याचा वंचित बहुजन आघाडीने जाहीर निषेध केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा