अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीची आत्महत्या …..

6

मुंबई, ३० जुलै २०२०: मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख यांचे पती अभिनेता आशुतोष भाकरे यांनी आत्महत्या केली आहे. तो ३२ वर्षांचा होता. आशुतोषने २९ जुलै रोजी महाराष्ट्रातील नांदेड येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार आशुतोष भाकरे हे गेल्या काही दिवसांपासून नैराश्याने ग्रस्त होते. काही दिवसांपूर्वीच त्याने फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्याद्वारे त्याने आपल्या चाहत्यांना सांगितले की कोणतीही व्यक्ती आत्महत्या का करते. आशुतोषने २१ जानेवारी २०१६ रोजी अभिनेत्री मयूरी देशमुखशी लग्न केले. ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून मयुरीला ओळखले जाते. त्याच वेळी आशुतोषने ‘इचार ठरला पक्का’ तसेच ‘भाकर’ या चित्रपटात काम केले.

आशुतोषच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांना यावर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. त्यांच्या निधनानंतर मराठी इंडस्ट्रीत दु:खाची लाट उसळली आहे. आशुतोष यांच्या पश्चात पत्नी मयुरी देशमुख, आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.

अनेक कलाकारांना बसला धक्का व्यक्त केल्या प्रतिक्रिया….

‘३१ दिवस ‘ मधील मयुरीचा सहकलाकार शशांक केतकरने ही बातमी ऐकून आश्चर्यचकित झाले आहेत, ते म्हणतात, “मी आशुतोषला दोन वेळा भेटलो होतो आणि तो मला खूप आवडला होता.त्याच्यासारखी व्यक्ती असे टोकाचे पाऊल उचलेल या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण आहे. मला हे माहित नाही की त्याला हे करण्यास कशाने प्रेरित केले. देव मयुरी आणि त्याच्या कुटुंबाला हे सहन करण्यास सामर्थ्य देईल.तसेच रीना अग्रवालनेही सांगितले.”जेव्हा आम्ही चित्रपटाचे प्रमोशन करत होतो, तेव्हा मयुरी आणि मी कधीकधी तयार होण्याकरता तिच्या घरी जायचो . त्यावेळी मी आशुतोषला भेटले होते. तो खूप सुखी-सुदैवी व्यक्ती होता. ही बातमी ऐकल्यानंतर, मी सुन्न झाले होते. मी मयुरीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. कुटूंबियांबद्दल माझ्या संवेदना.जे घडले त्याबद्दल मला खरोखरच धक्का बसला. ”

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा