मुंबई : ‘सैराट’ फेम अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
रिंकू लवकरच अभिनेता ताहिर शब्बीरसोबत ‘१००’ या वेब सीरिजमध्ये झळकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
ताहिरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर रिंकूचा फोटो पोस्ट केला होता.
या फोटोंवरुन रिंकू वेब सीरिजमध्ये दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
रिंकूच्या आगामी वेब सीरिजचे चित्रीकरण माटुंगा येथे सुरु आहे. या सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता देखील दिसणार आहे. ही वेब सीरिज हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.












































