ही अभिनेत्री झाली वृंदावनात स्थायिक…!

Actress Sneha Wagh Settles in Vrindavan
अभिनेत्री स्नेहा वाघ;

Actress Sneha Wagh Settles in Vrindavan: अभिनेत्री स्नेहा वाघ हिने अधुरी एक कहाणी’, ‘काटा रुते कुणाला’ यांसारख्या मराठी मालिका केल्या. त्याचबरोबर गेल्याच वर्षी तिची ‘नीरजा’ ही मालिका संपली. त्याआधीही या अभिनेत्रीने अनेक मालिका केल्या. मात्र आत्ता स्नेहा वाघ ही वृंदावनात रमली आहे.श्रीकृष्णाच्या भक्तीत ती तल्लीन झाली आहे. त्यामुळे ती केवळ कामासाठीच मुंबईत येते.पुन्हा मराठी मालिकेत काम करणार का? असं विचारलं असता तिने उत्तर दिलं की

एका मुलाखतीत स्नेहा वाघ म्हणाली की “मराठी मालिका मी आता नाही करु शकत. आता माझी भाषा थोडी बदलली आहे. जेव्हा मी हिंदीत काम सुरु केलं तेव्हा सुरुवातीला मला दिग्दर्शकाने छडीने मारलं होतं. कारण माझे उच्चार थोडे भलतेच येत होते. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आपण ज्या भाषेत मनात विचार करतो ती भाषा तुमची चांगली होते. तेव्हा माझ्यात बदल झाला. मध्ये मी फिल्ममेकिंगसाठी लंडनलाही गेले होते. त्यामुळे तेही विश्व मी बघितलं. आता वृंदावनात राहून ब्रज भाषा यायला लागली आहे. त्यामुळे आता पुन्हा मराठीत काम करणं शक्य नाही.”

Actress Sneha Wagh Settles in Vrindavan Embraces Spiritual Life Over Acting

ती पुढे म्हणाली, “मला टीव्हीवर पुन्हा काम करायला आवडेल. पण काय चालतंय काय नाही चालत आहे हे मी ओळखायचा प्रयत्न करत आहे. ओटीटीही आता आलं आहे. आता तर टीव्ही मोबाईलवर आला आहे. त्यामुळे सगळं आत्मसात करणं अवघड जात आहे. ते सेट झालं की कामही आपोआप सुरु होईल. सध्या मी वृंदावनातच म्युझिक अल्बम शूट करत आहे. दिग्दर्शनही करत आहे.”

न्यूज अनकट प्रतिनिधी; इंदिरा तेंडोलकर