पुणे, २९ सप्टेंबर, २०२२ : रेडिओ वन आणि आर्यन्स मिडीया हाऊसच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात आर जे मीनल आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी पुण्यातील आर्यन्स मिडिया ग्रुपला भेट दिली. यावेळी सोनाली कुलकर्णीने आर्यन्सच्या सहका-यांबरोबर मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी सोनालीने आर्यन्सचे सीईओ आणि सीफओ मनोहर जगताप यांच्याशी संवाद साधला. मनोहर जगतापांनी उद्योगविश्व निर्माण केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. यावेळी मनोहर जगताप यांनी ग्रीन एनर्जी या विषयांवर प्रकाशझोत टाकला. मेक इन इंडियाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत आर्यन्स मिडीयाचा छोटासा वाटा असल्याचे मनोहर जगताप यांनी सांगितले.
आर्यन्स मिडीयाचा आणखी एक भाग म्हणजे न्यूज अनकट वेब पोर्टल. न्यूज अनकट या वेब पोर्टलचे प्रमुख संदीप राऊत यांनी सांगितले की, न्यूज अनकट हे पोर्टलच्या स्वरुपात सुरु असून राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सारासार पोर्टलवर दाखवला जातो. त्याचबरोबर न्यूज अनकटचा सॅटेलाईट चॅनल लवकरच येणार असून पुण्यातून सुरु होणारा हा पहिला सॅटेलाईट चॅनल आहे.
स्वरंग हा एक आर्यन्स मिडीयाचा करमणूक करणारा इन्फोटेनमेंट चॅनल आहे. साधारण १५ मे २०२३ पर्यंत स्वरंग हा चॅनल रसिकांच्या भेटीला येणार असल्याचं स्वरंगचे प्रमुख प्रविण वानखेडे यांनी रेडिओ वनशी बोलताना सांगितले. स्वरंगमध्ये साहित्य, कला, करमणूक आणि माहितीचा मिलाप असणारे पुण्यातून सुरु होणारे पहिले करमणूकीचे चॅनल असल्याचे प्रविण वानखेडे यांनी सांगितले.
आर्यन्स मिडीया ग्रुपचे न्यूज अनकट आणि स्वरंग हे सॅटेलाईट चॅनल लवकरच पुण्यातून सुरु होणार असून कलाकार, लेखक, रिपोर्टर, वार्ताहर या सर्वांसाठीच ही एक नक्कीच पर्वणी असेल आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज आकाशझेप घेईल, असा विश्वास आर्यन्स मिडीया हाऊसतर्फे व्यक्त करण्यात आला.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस