शिक्षण फक्त दहावी आणि अभिनेत्री ते बिझनेस असा प्रवास; तेजस्विनी पंडितने पहिल्यांदा केला खुलासा…

Tejaswini Pandit Inspiring Journey
तेजस्विनी पंडित;

Tejaswini Pandit Inspiring Journey: ग्लॅमरस अभिनेत्री तेजस्विनी पंडित सध्या ‘येरे येरे पैसा ३’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. अभिनय क्षेत्रात एन्ट्री घ्यायची असं तेजस्विनीने कधीच ठरवलं नव्हतं. तिला फॅशन डिझायनिंगची प्रचंड आवड होती. दहावी उत्तीर्ण झाल्यावर तेजस्विनीने अचानक सिनेविश्वाकडे वळण्याचा निर्णय का घेतला याबद्दल तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

तेजस्विनी पंडित म्हणाली, “दहावी झाल्यावर मला इंटिरिअर किंवा फॅशन डिझायनिंग करायचं होतं. त्यातही कल फॅशन डिझायनिंगकडे जास्त होता… तेव्हा माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की, तेजू आपल्याकडे पैसे नाहीयेत. त्यावेळी इंटिरिअर आणि फॅशन डिझायनिंग या दोन्ही कोर्सेसची फी जवळपास ६० ते ८० हजार एवढी होती… बाबांनी पैशांचं सांगितल्यावर मी म्हणाले काहीच हरकत नाही. पण, हे देखील महत्त्वाचं की, मला नॉर्मल शिक्षण म्हणजेच अकरावी-बारावी वगैरे करायचं नव्हतं. बाबांना मी सांगितलं आता पैसे नसतील तर नको करुयात मी जेव्हा पैसे कमवेन तेव्हा शिक्षण पूर्ण करेन.”बाबांशी सगळं माझं बोलणं झालं आणि त्यानंतर माझी सिनेक्षेत्रातच एन्ट्री झाली.

“फॅशन डिझायनिंगबद्दल माहिती असल्याने तेजाज्ञा हा ब्रँड सुरू केला. मी आणि अभिज्ञा भावे आमचा तो ब्रँड होता, सर्वांचा खूप छान प्रतिसाद मिळाला होता. आम्ही दोघींनी त्या ब्रँडसाठी खूप काम केलं. यानंतर आता मी एक सलोन सुरू केलंय. कलाक्षेत्रात आपल्याला प्रत्येकवेळी काम मिळेलच असं नाही.

इथे गॅरंटी कशाचीच नाही…त्यामुळे आपल्या हाताशी एक व्यवसाय असावा असं मला वाटत होतं. यातूनच मग मित्रांच्या साथीने सलोन सुरू केलं. आता हा व्यवसाय कसा वाढवता येईल याचे प्लॅन्स सुरू आहेत.” असं तेजस्विनी पंडितने सांगितलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी; इंदिरा तेंडोलकर