अदानींना येणार ‘अच्छे दिन’; महाराष्ट्र सरकार लवकरच ‘अदानी समूहा’कडे सोपविणार धारावी पुनर्विकास प्रकल्प

मुंबई, ८ जानेवारी २०२३ : अमेरिकेतील गुंतवणूक सल्लागार कंपनी हिंडेनबर्गने दिलेल्या अहवालानंतर गेल्या काही दिवसांपासून अदानी ग्रुप अडचणीत आला आहे; परंतु गेल्या दोन दिवसांपासून शेअर बाजारात ‘अदानी समूहा’च्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले, की महाराष्ट्र सरकार ‘धारावी पुनर्विकास प्रकल्प’ औपचारिकपणे ‘अदानी समूहा’कडे सोपविणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पुन्हा एकदा अदानींना ‘अच्छे दिन’ येणार असल्याची चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्र सरकार लवकरच ‘धारावी पुनर्विकास प्रकल्प’ हा अदानी समूहाकडे सोपविण्यासाठी ठराव जारी करणार आहे. यासंदर्भात जीआर जारी करण्यात येईल; पण यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींवर काम करणे आवश्यक आहे. ते लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

महाराष्ट्र सरकारने मुंबई धारावीचा पुनर्विकास करण्याची योजना तयार केली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी समूह हा सर्वाधिक बोली लावणारा ग्रुप होता. याअंंतर्गत अदानी यांच्या कंपनीसोबत करार करून झोपडपट्टी परिसर ग्रुप केला जाणार आहे. या प्रकल्पाचा फायदा परिसरातील झोपडपट्टीवासीयांना होणार आहे. धारावी झोपट्टीमध्ये राहणाऱ्या पात्र लोकांना मोफत घरे मिळू शकणार असल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा