मुंबई : काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आदर्श घोटाळा प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. आदर्श सोसायटी घोटाळ्याची सक्तवसुली संचालनालयाने पुन्हा चौकशी सुरू केल्याचे वृत्त होते. परंतु, अशी कोणतीही चौकशी केली जाणार नसल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे.
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाआघाडीच्या सरकार स्थापन झाले आहे. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यात अशोक चव्हाण शपथ घेणार असल्याचे वृत्त होते. परंतु, आदर्श प्रकरणाची पुन्हा एकदा नव्याने चौकशी होणार अशी चर्चा रंगली होती.
परंतु, सक्तवसुली संचालनालयाने एक पत्रक प्रसिद्ध करत आदर्श सोसायटीच्या पुन्हा नव्याने चौकशीचे वृत्त फेटाळले आहे.