Adiba Anam Shad and Jaykumar Aade from Yavatal succeed UPSC: यवतमाळ जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरणारी बातमी नुकतीच समोर आली आहे. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी दिलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत काल निकाल लागला. यामध्ये यवतमाळच्या दोन उमेदवारांनी यश संपादन करत यवतमाळ जिल्ह्याच नाव देशपातळीवर पोहोचवल आहे. आदिबा अनम अशफाक शाद आणि जयकुमार आडे अस यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच नाव आहे. यात आदिबा अनम अशफाक शाद यांनी १४२ वा क्रमांक तर जयकुमार आडे यांनी यांनी ३०० वा क्रमांक मिळवून जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे.
या यशामागे त्यांची सातत्याने केलेली मेहनत, आत्मविश्वास आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा आहे. ग्रामीण पार्श्वभूमी असूनही त्यांनी राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली,ही बाब विशेष कौतुकास्पद आहे. या दोघांचे यश जिल्ह्यातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे आणि स्पर्धा परीक्षेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल.
यवतमाळ जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वच स्तरांतून या दोघांचं अभिनंदन केलं जात आहे. याशिवाय यवतमाळकरांकडून त्यांना पुढील सेवेसाठी आणि उज्ज्वल भविष्याच्या वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी, सचिन झीटे