मुंबई ,१२ सप्टेंबर २०२० : ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवाल याचे निधन झाले असून वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. किडनी निकामी झाल्याने आदित्य पौडवालचे निधन झाल्याची माहिती आहे. आज (शनिवार १२ सप्टेंबर) ला पहाटे त्याने अखेरचा श्वास घेतला.
गेल्या काही महिन्यात अनेक प्रसिद्ध कलाकारांच्या निधानातून बॉलिवूड आणि चाहते सावरले नसताना आता आणखी एक धक्का बसला आहे. दिवंगत संगीतकार अरुण पौडवाल आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचा आदित्य हा मुलगा. आदित्यही आई-वडिलांप्रमाणे संगीत क्षेत्रात कार्यरत होता.
आदित्य पौडवालच्या पश्चात आई अनुराधा पौडवाल आणि गायिका बहीण कविता पौडवाल असा परिवार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी