रत्नागिरी, १६ सप्टेंबर, २०२२: सध्या आदित्य ठाकरे उदय सामंत यांच्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर तोफ डागली. त्यात त्यांनी शिंदे गटाला खुले आव्हान दिले. त्यात त्यांनी पाठीत खंजीर खुपसू नका, समोरुन लढा नमूद केले. त्यात त्यांनी असेही सांगितले की तुम्ही चाळीस जण आणि मी एकेचाळीसावा. आपण सगळे मिळून राजीनामा देऊ आणि परत निवडणूक लढू, असे त्यांनी सभेत सांगितले.
वेदांता वरुन त्यांनी शिंदे सरकारला धारेवर धरले. एक प्रकल्प गेला आता अजून किती प्रकल्प घालवणार असेही म्हणत त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला. खोके सरकार असं आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारला नाव ठेऊन त्यांची पुन्हा एकदा टर उडवली.
रत्नागिरी हा उदय सामंत यांचा बालेकिल्ला. पण या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंनी मोठे धाडस केले. त्यांना झेड दर्जाची सुरक्षा दिली. पण त्यासाठी कोणत्याही गाड्या नाही. केवळ सुरक्षारक्षक दिले. त्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षेवरून वादाची ठिणगी उडणार हे निश्चित आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस