मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभागांमध्ये उद्यापासून कोरोना निदान चाचणी मोफत उपलब्ध करुन देण्याचा प्रशासनाचा निर्णय

मुंबई, २ नोव्हेंबर २०२० : मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड- १९ चा प्रसार अधिक प्रभावीपणे रोखण्याच्या दृष्टीनं महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये कोरोना निदान चाचणी मोफत उपलब्ध करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.

ही योजना उद्यापासून सुरु होणार असून महानगरपालिका क्षेत्रातले दवाखाने, रुग्णालयं अशा एकूण २४४ ठिकाणी कोविड विषयक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. या २४४ ठिकाणच्या पत्त्यांची यादी विभागनिहाय नियंत्रण कक्षांद्वारे आणि महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या क्रमांकावर उपलब्ध होणार आहे.

या ठिकाणी मोफत वैद्यकीय चाचणी सुविधा ‘वॉक इन’ पद्धतीनं उपलब्ध होईल. तसंच यापैकी काही ठिकाणी आर.टी.पी.सी.आर. पद्धतीची वैद्यकीय चाचणी; तर उर्वरित ठिकाणी अँटीजेन आधारित वैद्यकीय चाचणी सुविधा उपलब्ध होईल, असं महानगरपालिकेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा