गोपाळवाडीला प्रशासक समन्वय सभा संपन्न

दौंड, २१ ऑक्टोबर २०२०: दौंड येथे ग्रामपंचायत सभागृहामध्ये पाटस-खडकी, लिंगाळी-मलठण या जिल्हा परिषद गट व गणातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत ग्रामसेवक, प्रशासक यांची समन्वय सभा झाली.

यावेळी सभेचा उद्देश व मार्गदर्शन गट विकास अधिकारी आजिंक्य येळे यांनी सांगितले व १४ व्या वित्त आयोगाच्या शिल्लक निधीतून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाणी पुरवठा योजना, शेत रस्ते,ओढयावरील पूल इत्यादी कामे प्राधान्याने करावीत अशी मागणी पंचायत समिती सदस्य प्रकाश नवले, ताराबाई देवकाते, विकास कदम यांनी केली.

जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय व्यक्तीच्या घरामध्ये नळजोड देणे या योजनेमध्ये सर्व ग्रामसेवकांनी प्रस्ताव व माहिती त्वरीत देण्याच्या सुचना जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती सारिकाताई पानसरे यांनी केली. ग्रामसेवक प्रशासक यांनी समन्वयाने कामकाज करावे असे सांगीतले. १५ व्या वित्त आयोगाच्या कामासंदर्भात माहिती सहाय्यक गट विकास अधिकारी अजित देसाई यांनी दिली.

यावेळी १५ व्या वित्त आयोगाचा मंजुर आराखडा पत्रे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ग्रामसेवकांना देण्यात आले. यावेळी ग्रामसेवक व प्रशासक उपस्थित होते. उपस्थित पदाधिकारी, अधिकारी यांचा सत्कार गोपाळवाडी ग्राम पंचायतच्या वतीने पंचायत समिती सदस्य विकास कदम, ग्रामसेविका स्वातीताई लामकाने, ठकसेन सुळ यांनी केला. लिंगाळीचे ग्रामसेवक मच्छिद्रं निगडे यांनी आभार मानले.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा