उरुळी कांचन, दि. ८ ऑगस्ट २०२०: पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक देशमुख यांच्यावर तीन विद्यमान आमदार यांना हाताशी धरून बिनबुडाचे आरोप करणाऱ्या भ्रष्ट संचालक मंडळाच्या विरोधात शेतकरी व व्यापारी आक्रमक झाले आहेत.
बी. जे. देशमुख हे प्रशासक म्हणून येण्यापूर्वी तत्कालीन संचालक मंडळामुळे बाजार समिती जवळपास ७ ते ८ कोटी रुपये तोट्यात होती. देशमुख यांनी प्रशासक म्हणून कार्यभार हाती घेतल्यानंतर सर्व कामांचा आढावा व माहिती घेऊन तत्कालीन संचालक मंडळाने मात्र बी. जे. देशमुख यांनी ते काम थांबवण्याचे धाडस केले. व्यापारी वर्गाने पार्किंग व गाळ्यांसाठी मागणी केल्यानंतर १०२ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला. तसा प्रस्ताव पण मंडळाकडे पाठवण्यात आला असता आराखडा तयार करून महानगरपालिकेकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला व आतापर्यंत त्यातील ३८ कोटी खर्च झाल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत व्यापारी व शेतकरी यांच्याकडून मिळालेली माहिती अशी आहे की, ७ कोटी रुपये तोट्यात असलेली पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती आज बी. जे. देशमुख प्रशासक म्हणून आल्यापासून कोणत्याही राजकीय दबावाला भीक न घालता व बळी न पडता बाजार समितीच्या व कर्मचारी यांच्या भविष्य निर्वाह निधी मिळून जवळपास २०० कोटी रुपयांच्या ठेवी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जमा केल्या आहेत.
आतापर्यंत बी. जे. देशमुख यांनी बाजार समितीत व्यापारी व शेतकरी यांना विश्वासात घेऊन फार मोठे निर्णय घेऊन प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. पूर्वी शिवाजीराव कोंडे अध्यक्ष असताना खेड शिवापूर येथील ५ एकर गावरान जागा मिळवून दिली होती. मात्र २५ वर्षात कोणतेही काम या जागेवर न झाल्याने ही जागा शासनाने ताब्यात घेतली होती. या जागेबाबत देशमुखांनी शासनाकडे पाठपुरावा करून पुन्हा बाजार समितीच्या ताब्यात जागा मिळवली व फुलबाजार विभागाची २ एकर जागा मॅफकोने ताब्यात घेतली होती.
तसेच ट्रक पार्किंगसाठी ३.५ एकर तसेच मोशी येथील ९ जागाही देशमुख यांनी बाजार समितीच्या ताब्यात घेतली. आज शेतकरी व व्यापारी यांचे कल्याण करणाऱ्या देशमुखांची चौकशी करण्याऐवजी तत्कालीन बाजार समितीच्या संचालक व यशवंत सहकारी कारखान्यातील मंडळाच्या विरोधातील जिल्हा निबंधक यांनी थांबलेली कारवाई केली तर बरे होईल. हे शेतकऱ्यांचे सरकार असल्याचे जगजाहीर होईल व देशमुख यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून राष्ट्रवादीच्या काही आमदारांना अंधारात ठेऊन व चुकीची माहिती देऊन सह्या घेण्यात आल्या आहेत असे शेतकऱ्यांनी बोलून दाखवले आहे. तर काहींना बाजार समितीवर वर्णी लागावी यासाठी तयार करून सह्या घेण्यात आल्या आहेत. तर काहींचा जिल्हा बँकेत जमा असलेल्या ठेवींवर डोळा असल्याने उगाचच बदनामी करण्याचे षड्यंत्र रचले आहे. परंतु सर्व शेतकरी व व्यापारी देशमुखांच्या पाठीशी उभे रहाणार असून वेळेप्रसंगी मोठे आंदोलन करण्याची तयारीही करत आहोत, असे हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणून माजी कृषीमंत्री शरद पवारांकडे पाहिले जाते. शरद पवार व पालकमंत्री अजित पवार यांनी देशमुखांवर ज्यांनी चुकीचे आरोप केले आहेत त्यातील काहींच्यावर आरोप सिद्ध झाले आहेत. त्यांच्यावरच लवकरात लवकर कारवाई करून शेतकऱ्याला न्याय द्यावा व शेतकऱ्यांचे सरकार आहे हे सिध्द करावे अशी मागणी हवेली तालुका शेतकरी व व्यापारी करीत आहेत.
याबाबत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, पालक मंत्री अजित पवार, व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, यांना भेटणार असल्याची माहिती व्यापारी वर्गाने व शेतकऱ्यानी दिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे