पुणे, 17 डिसेंबर 2021: Tecno Spark 8T भारतात लॉन्च झाला आहे. हा चिनी कंपनीचा लेटेस्ट अफोर्डेबल स्मार्टफोन आहे. Tecno Spark 8T ही कंपनीच्या जुन्या Tecno Spark 8 ची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे. Tecno Spark 8T मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आणि 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Tecno Spark 8T किंमत आणि उपलब्धता
Tecno Spark 8T ची भारतात किंमत 8,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत त्याच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटसाठी आहे. हा फोन Atlantic Blue, Cocoa Gold, Iris Purple आणि Turquoise Cyan कलर पर्यायांमध्ये येतो. हा फोन Amazon India वरून विकला जात आहे. Tecno Spark 8 चे 2GB RAM आणि 64GB सप्टेंबरमध्ये भारतात लॉन्च करण्यात आले होते. याची किंमत 7,999 रुपये आहे.
Tecno Spark 8T चे फीचर्स
ड्युअल नॅनो सिमवर चालणाऱ्या Tecno Spark 8T मध्ये 6.6-इंचाचा फुल-एचडी + डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित HiOS v7.6 वर चालतो. त्याला 500 nits पर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आला आहे. या फोनमध्ये Octa-core MediaTek Helio G35 प्रोसेसर देण्यात आला आहे.
4GB रॅम सह या फोनमध्ये 64GB स्टोरेज देण्यात आले आहे. हे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येऊ शकते. फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाले तर Tecno Spark 8T मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा 50-मेगापिक्सेल आहे. यासोबत एआय लेन्सचा वापर करण्यात आला आहे.
मागील कॅमेरा एआय ब्युटी, एआर अॅनिमोजी आणि स्टिकर्स, गुगल लेन्स, टाइम-लॅप्स, स्लो मोशन, स्मार्ट पोर्ट्रेट आणि व्हिडिओ बोकेह यासारख्या अनेक प्रोफेशनल फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी मोडला सपोर्ट करतो. सेल्फीसाठी यात 8-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
Tecno Spark 8T मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यात ऑप्टिमाइज्ड पॉवर-सेव्हिंग मोड दिले गेले आहेत. कंपनीचा दावा आहे की त्याची बॅटरी 38 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाइम देते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे