पंजाब, २६ ऑक्टोंबर २०२२: प्रसिध्द पंजाबी रॅप गायक आणि काँग्रेस चे नेते शुभदीप सिंग उर्फ सिद्धू मुसेवाला यांची २९ मे २०२२ रोजी मानसा येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तर मुसेवाला प्रकणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. सिद्धू मूसेवाला यांची जवळची मैत्रीण आणि पंजाबी गायिका अफसाना खानची राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA च्या रडारवर आली आहे.
पंजाबची प्रसिद्ध गायिका अफसाना खानमुळे आता सिद्धू मूसेवाला हत्याकांड प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. अफसाना खानला राष्ट्रीय तपास संस्थेने NIA समन्स बजावले आहे. त्याअंतर्गत मंगळवारी २५ ऑक्टोबर ला सिद्धू मूसेवाला प्रकरणाबाबत NIA ने अफसानाची सुमारे ५ तास चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार, अफसाना खान ही सिद्धू मूसेवालाची मानलेली बहीण आहे. अफसाना खानची पुढे देखील काही दिवस अधिक चौकशी होऊ शकते, याशिवाय अफसाना खानचा बंबीहा गँगशी संबंध असण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
कोण आहे अफसाना खान
सिद्धू मूसेवाला आणि अफसाना खान यांनी अनेक गाणी एकत्र गायली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सिद्धू मूसेवाला यांनी अफसाना खानला धमकीच्या फोन कॉल्सची कथित माहितीही दिली होती. इतकंच नाही तर सिद्धू मूसेवाला यांनी अफसाना खानसोबत ‘जांदी वॉर’ हे शेवटचं गाणंही गायलं होतं. पण, न्यायालयाने या गाण्यावर बंदी घातली आहे. अफसाना खान सुपरस्टार सलमान खानच्या प्रसिद्ध शो बिग बॉस १५ मध्ये दिसली होती. व्हॉइस ऑफ पंजाब सीझन ३, राइजिंग स्टार-१ या कार्यक्रमांमध्ये अफसाना खाननं सहभाग घेतला होता. लाला लोरी,धक्का, दिला हिम्मत कर या अफसानाच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
प्रसिध्द पंजाबी रॅप गायक आणि काँग्रेस चे नेते शुभदीप सिंग उर्फ सिद्धू मुसेवाला यांना २९ मे २०२२ रोजी मानसा येथे त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पंजाब मध्ये आलेल्या आम् आदमी पार्टी च्या सरकारने त्यांची सुरक्षा व्यवस्था काडून घेतल्या नंतर अवघ्या २४ तासा च्या आत त्यांची हत्या करण्यात आली.
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात २३ जणांना अटक करण्यात आली आहे, तसेच या प्रकरणात एकूण २५ जणांची नावे सांगण्यात आली आहे. तसेच यामध्ये चकमकी दरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे