तब्बल १२४ वर्षानंतर हिमालयाच्या कुशीत उमललं ‘हे’ फुल…!

पुणे, २१ सप्टेंबर २०२०: हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल, पण सत्य हे आहे की १२४ वर्षांनंतर हिमालयाच्या कुशीत एक दुर्मिळ जातीची फुल पाहिलं गेलय. शास्त्रज्ञांनी या फुलाची ओळख लिपेरिस पिगमेइया म्हणून केलीय. १०० वर्षांपूर्वी सिक्कीम आणि पश्चिम बंगालमध्ये हे फूल दिसलं होतं. आता हे फूल पश्चिम हिमालय प्रदेशातील उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात दिसू लागलं आहे. दोन महिन्यांपूर्वी दोन वन्य अधिका-यांनी हे फूल पाहिलं होतं.

भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेच्या वनस्पती तज्ञांनी या फुलांचा अभ्यास केला आणि त्याचा अहवाल ३० जुलै रोजी फ्रेंच वैज्ञानिक जनरल ‘रिर्चडाइना’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. यानुसार, जगात सुमारे ३२० प्रजाती लिपारिस पिगमेइया आहेत, त्यापैकी ४८ प्रजाती भारतात आहेत. यापैकी, पश्चिम हिमालयात आतापर्यंत १० प्रजाती सापडल्या आहेत.

चमोली जिल्ह्यातील सुमारे ३,८०० मीटर उंचीवर सप्तकुंड ट्रॅकवर हे आश्चर्यकारक आणि दुर्मिळ फूल दिसलं आहे. यापूर्वी कधीही या भागात हे फूल दिसलं नव्हतं. वन अधिकारी हरीश नेगी यांचं म्हणणं आहे की, उत्तराखंड वनविभागाच्या दोन अधिका-यांनी जूनमध्ये हे दुर्मिळ फुल फुलल्याची पुष्टी केली होती. कनिष्ठ संशोधन सहकारी मनोज सिंह म्हणतात की दोन महिन्यांपूर्वी हे फूल सापडल्यानंतर ते पुण्यातील बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडे (बीएसआय) तपासणीसाठी पाठविण्यात आलं होतं. यावेळी या फुलाची ओळख पटवण्यात आली.

पुण्यामधील भारतीय बोटॅनिकल सर्व्हे वेस्टर्न रीजनल सेंटरचे डॉ. जीवनलाल जलाल म्हणतात की, दुर्मिळ जातीचं हे फूल जून महिन्यात ५ सेमी पर्यंत फुलतं. त्यांनीच सर्वप्रथम या फुलांची ओळख पटवली होती.


न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा