८ महिन्यांनी ढोलकीच्या तालावर, अन् घुंगराच्या बोलावर…..

पुणे, १५ डिसेंबर २०२०: माढा तालुक्यातील मोडनिंब गावच्या लावणी कलाकेंद्रात राज्यभरातील रसिक प्रेक्षकांचे पाय आता वळू लागले आहेत. कारण कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या ८ महिन्यांपासून बंद असलेल्या कलाकेंद्रांमध्ये आता पुन्हा एकदा ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर ऐकायला मिळणार आहे.

राज्य सरकारनं काही नियमावली आणि अटी तयार करुन राज्यातील कलाकेंद्र सुरु करण्यास परवानगी दिली आहे. कोरोनामुळं सर्व कला प्राकारवर वाईट वेळ आली होती. उपासमार, अर्थिक चणचण अशी या लोक कलावंताची दयनीय अवस्था झाली होती.

सरकारनं स्वताच्या पद्धतीनं सर्वतोपरी मदत देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरी देखील त्यांची मदत झाली नाही. उपासमारी मुळं अनेक कलावंतानी शेतात कामं केली तर काहींनी कायमची ही कला सोडली. मात्र, सरकारनं दिलेल्या परवानगी मुळं आता हेच कलावंत पुन्हा एकदा नव्या जोशानं प्रेक्षक मायबापांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

“आम्ही चाळ बांधतोय… पण तुम्ही येणार ना” ?

“आम्ही चाळ बांधतोय… पण तुम्ही येणार ना”, अशी साद लावणी कलावंतांनी व्हिडीओच्या माध्यमातून प्रेक्षकांना घातली आहे. येत्या २ जानेवारीपासून बालगंधर्व रंगमंदिर इथं लावणीचा दहा महिन्यानंतरचा पहिला प्रयोग होणार आहे. ५० टक्के क्षमतेनं नाट्यगृह सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळं लावणी कलावंतांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. लावणी कलावंतामध्ये उत्साह संचारला आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा हा लावणी कलावंतांसाठी सुगीचा काळ यंदा कोरोनामुळं वाया गेला.

कलाकाराची सर्वात मोठी पोहचपावती म्हणजे त्यांच्या कलेला मिळालेली दाद आसते. अर्थात टाळ्या आणि शिट्ट्या मिळाल्यावर कलाकार एक वेळ उपाशी पोटी राहू शकतो. मात्र, कलेपासून नाही. हिच कला त्यांना जगवत आसते. तेव्हा याच प्रेक्षकांच्या टाळ्या, आसुसले कान, शिट्ट्यांची चढाओढ पाहण्यासाठी आणि या कलाकारांसाठी येताय ना?

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा