८ महिन्यांनंतर प्रतिदिन कोविड बळींची संख्या घसरून ११७ वर

नवी दिल्ली, २७ जानेवारी २०२१: भारताने कोविडच्या जागतिक महामारीविरुद्धच्या लढाईत आता महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. प्रतिदिन नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांच्या संख्येने काल नीचांक गाठला आहे.

एकूण २३७ दिवसांच्या कालावधीनंतर (२५-२६ जानेवारी) २४ तासांतील सर्वात कमी म्हणजे ९,१०२ नव्या रुग्णांची नोंद झाली. यापूर्वी ४ जून २०२० ला ही संख्या ९,३०४ इतकी होती.

केंद्र सरकारने, कोविड विरुद्धच्या लढ्यात ‘संपूर्ण सरकार’ आणि ‘संपूर्ण समाज’ ह्या दृष्टीकोनावर आधारित शाश्वत, सामर्थ्यवान आणि प्रमाणित धोरणानुसार काम केल्यामुळे प्रतिदिन नोंदल्या जाणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सतत घसरण होत आहे. यामुळे रोज कोविडमुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्यादेखील कमी झाली आहे. गेल्या आठ महिन्यांहून जास्त काळानंतर (८ महिने ९ दिवस) देशात (२५-२६ जानेवारी) २४ तासांत १२० पेक्षा कमी (११७) व्यक्तींच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

भारतातील सक्रीय कोविड रुग्णांच्या संख्येत घट होऊन आज ती १,७७,२६६ इतकी आहे. देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या प्रमाणात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आणखी कमी होऊन १.६६% झाले आहे.

(२५-२६ जानेवारी) २४ तासांच्या कालावधीत एकूण सक्रीय रुग्णांच्या संख्येत ६,९१६ ची घट झाली आहे.

जागतिक पातळीवर प्रत्येक दशलक्ष लोकसंख्येमागे आता भारतात सर्वात कमी (१२८) सक्रीय कोविड रुग्ण आहेत. जर्मनी, रशिया, ब्राझील, इटली, इंग्लंड आणि अमेरिका या देशांमध्ये प्रत्येक दशलक्ष लोकसंख्येमागे सक्रीय असलेल्या कोविड रुग्णांची संख्या कितीतरी जास्त आहे.

भारतातील दर दशलक्ष लोकसंख्येमागे असलेल्या रुग्णांचे प्रमाणदेखील जागतिक पातळीवर सर्वात कमी(७,७३६) आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा