मुंबई, ९ ऑक्टोबर २०२२ : मनोरंजनसृष्टीत सेलिब्रिटी मंडळींच्या लग्नाची जितकी चर्चा होते तितकीच त्यांच्या घटस्फोटाची ही होते. बॉलीवूड असो किंवा टॉलीवूड सगळीकडे ही गोष्ट लागू होते, मागील काही महिन्यांमध्ये अनेक सेलिब्रिटी जोडप्यांनी घटस्फोट घेतला आहे. काहींनी लग्नाच्या पंधरा वर्षानंतर तर काहींनी एक-दोन वर्षातच हे पाऊल उचललं आहे.
यात अभिनेता आमिर खानने पत्नी किरण राव पासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अरबाज खान व मलायका अरोरा यांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर साऊथ अभिनेत्री समथा प्रभुणे आणि नागा चैतन्य चा घटस्फोट झाला. त्यापाठोपाठ धनुष आणि ऐश्वर्या या दोघांनी ही वेगळे झाल्याची घोषणा केली होती.
दरम्यान आता अशी बातमी समोर येत आहे, की साउथ सुपरस्टार अभिनेता धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्या आपल्या नात्याला दुसरी संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांनी यावर्षी जानेवारीमध्ये सोशल मीडियावर वेगळे होण्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते, पण आता त्यांनी त्यांचा निर्णय बदललेला आहे.
धनुषच्या वडिलांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितले की या दोघांचा घटस्फोट होणार नाही दोघांमध्ये काही. मतभेद आहेत. म्हणून त्याचं भांडण झाल होतं, त्यांनी सागितलं की पती आणि पत्नी मध्ये भांडणे होत असतात. या संदर्भात आम्ही त्यांच्याशी बोलून दोघांनी समजावले असेही ते म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव