सुरत, दि.२२ मे २०२०: लॉकडाऊन सुरू झाल्यापासून व्यसनी लोकांचे फारच हाल होताना आपण पाहत आहोत. त्यासाठी काही करण्याची तयारी व्यसनी लोकांची असते. मात्र, तिसऱ्या लॉक डाऊननंतर दारू विक्रीला सरकारने परवानगी दिली, त्यामुळे याला काहीसा दिलासा मिळाला. दारूचा प्रश्न सुटल्याने तळीरामांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र आता एका नवीन गोष्टीसाठी गुजरामधील सुरत येथे रांगा लागण्यास सुरुवात झाली आहे. ही रांग दारूसाठी नसून तंबाखूसाठी असल्याचे निदर्शनास आले. सुरत मधील तंबाखू शौकिनांनी याठिकाणी रांगा लावल्या होत्या.
तंबाखू तसा ज्येष्ठापासून अगदी तरुण पिढी पर्यंतचा आवडता प्रकार. त्यासाठी कितीही किंमत मोजण्यास या व्यसनी व्यक्ती तयार होतात. लॉकडाऊनमुळे सध्या कुठेच तंबाखू मिळत नसल्याने ही व्यसनी माणस हैराण झाली आहेत. तसेच तंबाखूच्या पुडीची किंमत ८० रुपयांपर्यंत गेली आहे. तरीही लोक ती खात आहेत.
याबाबत एका ग्राहकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्याने सांगितले की, ‘कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन झाला. त्यामुळे मला किंवा माझ्या वडिलांना कोठूनही तंबाखू मिळू शकला नाही. तंबाखू खरेदी करण्यासाठी गेल्या काही तासांपासून मी या रांगेत उभा आहे.
याबाबत विक्रेत्याने सांगितले की, मला वाटतं की लॉकडाऊनमुळे दुकानं बंद होती. त्यामुळे ग्राहकांना तंबाखू मिळाली नाही. लॉकडाऊनच्या काळात मला अनेक फोन यायचे. कधी कधी तर मला फोन स्विच ऑफ करायला लागायचा. ज्यांना माझ्या घराचा पत्ता मिळाला ते सरळ घरी आले. असे सुरत मधील एका तंबाखू विक्रेत्याने सांगितले.
सरकारने देशात दारू विक्रीला परवानगी दिली असताना असेच काहीसे चित्र दिसले होते. अनेक तास लोकं दारूच्या दुकानांसमोर उभे राहिले. त्यानंतर अनेक राज्यात गर्दी होऊ नये म्हणून होम डिलिव्हरीची सुविधादेखील सुरू झाली. आता दारू नंतर लोकांनी तंबाखूसाठी गर्दी केली आहे. असून सरकार यावर काय तोडगा काढते, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: