अमेठीनंतर आता बारामतीचा करेक्ट कार्यक्रम, राम शिंदे यांचा दावा

पुणे, ४ सप्टेंबर २०२२ : इंदापूर येथील अर्बन बँकेच्या सभागृहात सीतारामन, बावनकुळे यांचा दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर भाजप संवाद बैठक आयोजित केली होती या दरम्यान राम शिंदे बोलत होते की, ए फॉर अमेठी मिशन सक्सेसफूल झालं, आता बी फॉर बारामतीचं मिशन आम्हाला पूर्ण करायचं आहे.

बारामती लोकसभा मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी भाजपने आता मिशन बी चालू केलं आहे. २०२४ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या वेळेत अनेक मोठे नेते बारामतीला भेट देणार आहेत. याची सुरवात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यापासून होणार आहे. निर्मला सीतारामन सप्टेंबर महिन्यातील २२, २३ व २४ तारखेला बारामतीला भेट देणार आहेत. तर दुसरीकडे नवनिर्वाचित भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पुढच्या दोन दिवसांत ७ तारखेला बारामतीचा दौरा करणार आहेत. तर सीतारामन यांच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावाही बावनकुळे घेणार आहेत.

आम्ही जसा अमेठीचा किल्ला सर केला तसाच आत्ता बारामतीचा किल्लाही सर करणार. २०१४ साली आम्ही अमेठीत हरलो होतो पण आमच्या सातत्यपूर्ण कामगिरीने आम्ही २०१९ ला यश मिळवले. राहुल गांधींनी वायनाड मतदारसंघ शोधला होता. पण आता सुप्रिया सुळे यांनीही त्यांचा वायनाड सारखा मतदारसंघ शोधण्याची गरज आहे. कारण आता मिशन बारामतीचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी दिल्लीतून नियोजन सुरु केलं आहे. यावेळी काहीही झालं तरी बारामतीचा गड ताब्यात घेणारच असा आत्मविश्वास भाजप नेते आणि बारामतीच्या प्रभारीपदाची जबाबदारी असणारे राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे.पुढे राम शिंदे बोलतात की अमेठीमध्ये २०१४ साली आम्हाला पराभवाचा धक्का बसला होता. पण आम्ही कधी थांबलो नाही. आमचे प्रयत्न नेहमी सुरुच ठेवले. पण आम्हाला २०१९ ला यश भेटलच. राहुल गांधी पराभूत होतील, असं कोणालाही वाटत नव्हतं पण भाजपा ने त्यांना पराभूत करुन दाखवलेच.

आम्ही बारामती ला २०१४आणि २०१९ साली हरलो. पण आता २०२४ ला कोणत्याही परिस्थितीत जिंकणारच, असा दावा शिंदे नी केला आहे. सीतारामन, बावनकुळे यांचा दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर भाजप संवाद बैठकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, किसन मोर्चा प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पृथ्वीराज जाचक, अविनाश मोटे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, मारुती वणवे, तेजस देवकाते यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा