कोरोना नंतर कुक्कुटपालन व्यवसाय घेतोय उभारी…

इंदापूर, २६ ऑक्टोबर २०२०: कोरोना काळात अक्षरशः कुक्कुटपालन व्यवसाय देशोधडीला लागले होते. सध्या देशभरातील कोरोनाची स्थिती समाधानकारक असल्याचे दिसत आहे. परंतु मागील महिन्यात कुक्कुटपालन व्यवसाय देशोधडीला लागला होता, त्यास कारणही तसेच होते. चिकन बाबतच्या अफवा समज आणि गैरसमज यामुळे अनेकांनी चिकन खाणे बंद केल्यामुळे कुक्कुटपालन व्यावसायिक देशोधडीला लागले होते. यामध्ये काही कुक्कुट पालकांनी अक्षरशः कोंबड्या मोठ्या खड्ड्यात गाढून दिल्या होत्या तर काहींनी रानात सोडून दिल्या होत्या.

सध्या बाजारात चिकनचे दर प्रति किलो दोनशे ते अडीचशे रुपये आहे. कुकूटपालन व्यवसाय हा शेतीला जोडधंदा म्हणून केला जात असला तरी सध्या या व्यवसायाकडे प्रमुख व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे. लाखो रुपये गुंतवून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला जातो. यामधून कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकरी व्यवसायिकांना लाखो रुपयांचा नफा होत असतो. परंतु कोरोना काळात काही चुकीच्या अफवांमुळे हेच कुकुट पालन करणारे शेतकरी व्यवसाय कागदी देशोधडीला लागले होते. परंतु सध्या परिस्थिती बदलली आहे त्यामुळे कुकूटपालन व्यवसाय सध्या तेजीत असल्याचे कुक्कुटपालन व्यावसायिक सांगत आहेत.

त्यामुळे एकंदरीतच कोरोनानंतर शेतकऱ्यांचा एकमेव व्यवसाय कुक्कुटपालन हा उभारी घेत असल्याचे पहावयास मिळत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा