पुणे, २३ ऑक्टोबर २०२२ : पुणे सोलापूर महामार्गावरील अपघातांचे प्रमाण आणि वाढते अतिक्रमण थांबवण्यासाठी लोणी काळभोर हद्दीतील कवडीपाट टोल नाका ते कासुर्डी टोलनाक्यापर्यंतच्या रस्त्याच्या कडेला असलेली अतिक्रमणे हटवण्याचा निर्णय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरनाणे घेतला आहे.
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने याबाबतची नोटीस प्रसिद्ध केली आहे. दिवाळीनंतर कधीही ही अतिक्रमणे काढण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पुणे सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोल नाका ते कासुर्डी टोलनाक्यापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पथारीवाले, हॉटेल चालक, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, दुकान मालकांनी मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. यामुळे या महामार्गावर वाहतूक कोंडी बरोबरच अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
दिवाळीनंतर कोणत्याही क्षणी पुणे सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोलनाका ते कासुर्डी टोलनाका येथील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी रस्त्याच्या मध्यभागापासून पंधरा मीटर (५० फूट) अंतरावरील अतिक्रमणे काढण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा कडून सांगन्यात आले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर