चार दिवसांनंतर मुंबईत पुन्हा रुग्णांमध्ये वाढ, 24 तासांत 16,420 पॉझिटिव्ह

मुंबई, 13 जानेवारी 2022: मुंबईतील कोरोना रुग्णांचा वेग पुन्हा एकदा वाढलाय. गेल्या 24 तासांत म्हणजेच बुधवारी मुंबईत 16420 नवीन कोविड रुग्णांची नोंद झालीय. तसेच 14649 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. बीएमसीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत 87% रिकव्हरी रेट नोंदवला गेला आहे. संपूर्ण महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर आज येथे 46,000 कोविड रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत सोमवारी 13,648 आणि रविवारी 19,474 नवीन रुग्णांची पुष्टी झाली. तर मंगळवारी मुंबईत कोरोना बाधितांचा हा आकडा 11647 होता. त्याच वेळी, शनिवारी 20 हजार 318 नवीन कोविड पॉझिटिव्ह आढळले, तर शुक्रवारी 20 हजार 971 कोरोना बाधित आढळले.

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, आज राज्यात 46,000 कोविड रुग्णांची नोंद झालीय, त्यामुळं लोकांनी निर्बंध शिथिल करण्याची अपेक्षा करू नये. पण घाबरण्याची गरज नाही. एकूण सक्रिय प्रकरणांपैकी, 86% गंभीर नाहीत आणि केवळ 0.32% रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गुरुवारी झालेल्या बैठकीत आम्ही लसीच्या अधिक डोसची मागणी करणार आहोत. आमच्याकडं बूस्टर डोससाठी डोस कमी आहे. आम्ही कोवॅक्सिनच्या 40 लाख डोस आणि 50 लाख कोव्हशील्डची मागणी करू. आपल्या राज्याला लसीकरण दर सुधारण्याची गरज आहे.

टोपे यांनी होम टेस्टसाठी निवड करणाऱ्यांनी जवळच्या आरोग्य केंद्राला कळवण्याची विनंती केलीय. त्यामुळं रुग्णांवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे.

जानेवारीमध्ये आतापर्यंत कोरोनाची प्रकरणं

12 जानेवारी – 16,420
11 जानेवारी – 11647
10 जानेवारी- 13648
09 जानेवारी- 19474
08 जानेवारी- 20318
07 जानेवारी- 20971
06 जानेवारी- 20181
05 जानेवारी- 15166
04 जानेवारी- 10860
03 जानेवारी- 8082
02 जानेवारी- 8063
01 जानेवारी- 6347

बॉलिवूड सेलिब्रिटीही कोविडचे बळी

मुंबईतील सिनेजगतातील सेलिब्रिटीही या तिसऱ्या लाटेला बळी पडत आहेत. भारताच्या व्हॉईस नाइटिंगेल लता मंगेशकरही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सापडल्या. 92 वर्षीय लता मंगेशकर यांना कोरोनाची सौम्य लक्षणं दिसल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. एकीकडं खुशी कपूरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असताना जान्हवी आणि बोनी कपूर होम क्वारंटाईन झाले आहेत. दुसरीकडं, हृतिक रोशनची माजी पत्नी सुझैन खान आणि कॉमेडियन वीर दास हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजित सिंग आणि त्याची पत्नी कोएल रॉय यांनाही कोरोनाची लागण झालीय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा