गौतम अदानींनंतर अनंत अंबानी मातोश्री’वर

मुंबई, २२ ऑक्टोंबर २०२२ : उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी काल रात्री उशिरा उद्धव ठाकरेंची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी उद्योगपती गौतम अदानी यांनीही उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

रात्री साडेआठच्या सुमारास मुकेश अंबानींचे पुत्र अनंत अंबानी मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यानंतर जवळपास साडे अकराच्या सुमारास ते तिथून बाहेर पडले. उद्धव ठाकरेंसोबत जवळपास तीन तास चर्चा झाली. यावेळी आदित्य ठाकरेही तिथे उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी गौतम अदानी यांनीही उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर लगेचच झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

यावर्षी महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ पहायला मिळत आहे. शिंदे गटाने शिवसेनेत बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. राज्यात सत्तांतर झाल्यावर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तेव्हापासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु असून, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं आहे.

दरम्यान, आता अनंत अंबानी ही भेट घडत असतानाच काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर होते. यावेळी महायुतीच्या चर्चाही रंगल्या होत्या. ही भेट राज्याच्या राजकारणातली महत्त्वाची भेट मानली जात आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी आता अदानींपाठोपाठ अंबानींचीही भेट घेतल्याने या दोन्ही भेटीचा तपशील समोर आला नाही. मात्र, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा