गोल पोस्ट राष्ट्रीय आईची हत्या करून, चितेवर कोंबडी भाजुन खाल्ली

आईची हत्या करून, चितेवर कोंबडी भाजुन खाल्ली

सिंहभूम (झारखंड), ३१ जानेवारी २०२१: देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे. ज्यामधे आजच्या परिस्थितीमधील माणुसकीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. जिथे नेहमी हत्येच्या घटना घडत आसतात. तिथे अजून एक घटना समोर आली आहे आणि इथे हत्या दुसरं तिसरं कोणी केली नसून पोटच्या पोरानेच जन्मदात्यांना मृत्यूच्या स्वाधीन केले.
झारखंडच्या पश्चिमी सिंहभूम जिल्हातील जोजोगुट्टू गावातून हि घटना समोर आली आहे. तरूणाने जन्मदात्या आईची हत्या केली. २०१६ मधे या तरूणाने आपल्या पित्याची देखील हत्या केली होती आणि त्याचीच शिक्षा गेली ४ वर्ष तो भोगत होता.  जेलमधून बाहेर आल्यावर त्याने हे कृत्य केले.
प्रधान सोय वय ३५ असे या नराधम आरोपी तरूणाचे नाव आहे. स्थानिकांनी वेळ राहताच आरोपीला बांधले आणि पोलिसांकडे सोपवले. या नराधमाने आईची हत्याच केली नाही तर तिच्या चितेवर जिंवत कोंबडी भाजून खाल्ली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात असून सर्वत्र तणावाचे वातावरण आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव
error: Content is protected !!
Exit mobile version