इतिहासात सूर्याजी पिसाळानंतर रामराजेंची गद्दार म्हणून नोंद होईल, भाजप आमदारांची टीका

9

सातारा, ९ सप्टेंबर २०२२ : महाराष्ट्राच्या राजकारणात सरकार इकडचं तिकडं गेलं, सत्ता उलटा पालथ झाली आणि आरोप प्रत्यारोप चालू आहेत. यादरम्यान भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये तर चांगलाच कलारंग रंगला आहे. भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी तर माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. जयकुमार गोरे बोलतात की स्वतःच्या पक्षाची वरिष्ठ नेत्यांशी सातारा जिल्ह्याची आणि इथल्या जनतेशी आयुष्यभर बेईमानी करणारे रामराजे नाईक निंबाळकर यांची सूर्याची पिसाळानंतर सर्वात थोर गद्दार म्हणून ओळख असेल. ज्या पक्षाने भरभरून दिलं त्या पक्षाची आणि पक्षाच्या प्रमुखांची बेईमानी करायला कधी मागेपुढे न पाहणाऱ्या राम राजेंची इतिहासात गद्दार म्हणून नक्कीच नोंद होईल, असे जयकुमार गोरे बोलत आहेत.

तर रामराजे आमदार गोरे यांच्या विधानावर प्रतिउत्तर देतात की भारतीय जनता पक्षामध्ये वाजपेयी नंतर आमदार जयकुमार गोरे हे थोर नेते आहेत. तर आमदार गोरे त्याविषयी बोलताना सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात स्वराज्याची बेईमानी करणारे काही गद्दार होऊन गेले. त्यात सूर्याजी पिसाळ यांचं सर्वात अगोदर नाव घेतलं जातं. तर आता यापुढे सूर्याजी पिसाळानंतर रामराजेचं नाव थोर गद्दार म्हणून घेतलं जाईल.

राष्ट्रवादी मध्ये असूनही ते अजित दादांना विरोध करतात. गोरे पुढं म्हणाले, रामराजे आजपर्यंत पडद्यामागून खेळ्या आणि गेमाच करत आले आहेत. मदत करणार्‍यांचा काटा काढण्यात ते एक्सपर्ट आहेत. जिल्ह्यात स्वपक्षाच्याच आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील आणि इतर अनेकांचे काटे काढण्यात रामराजेंनी कधी मागेपुढे बघितले नाही. ज्या पक्षाने त्यांना भरभरुन दिले त्या पक्षाशी सोयीनुसार गद्दारी करायला ते सर्वात पुढे असतात. राष्ट्रवादीत असूनही ते अजित दादांना विरोध करतात. जिल्हा बँकेत बसून खुशामतगार चार चौघांबरोबर बसून षडयंत्रे रचण्यात राजे वाकबगार आहेत. त्यांनी आजपर्यंत जिल्ह्याशी, इथल्या मातीशी आणि जनतेशी कायम गद्दारीच केली आहे. त्याबाबतीत त्यांचा कुणीच हात धरु शकणार नाही. माण आणि खटाव या दुष्काळी तालुक्यांबाबत त्यांच्या मनात नेहमीच आकस राहिला आहे. पृथ्वीच्या अंतापर्यंत या भागाला पाणी देता येणार नाही, असं हेच महाभाग नेहमी म्हणायचे. माण, खटावला पाणी मिळू नये म्हणून प्रयत्न करणारे रामराजे निवडणुका आल्या की माण, खटावात राजकारणाचा बाजार मांडतात, असंही गोरे म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे