विराट कोहलीने भर मैदानात पडल्या अक्षर पटेलच्या पाया, पण नेमक कारण काय ?

32
after-taking-the-wickets-of-kane-williamson-virat-kohli-fell-at-akshar-patels-feet
विराट कोहलीने भर मैदानात पडल्या अक्षर पटेलच्या पाया

Virat Kohli and Axar Patel दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफीचा हंगाम आता शेवटात आला असुन भारतीय संघाने आपल्या विजयाचे चक्र सुरूच ठेवले आहे. काल इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात दुबई मध्ये सामाना खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंड संघावर ४४ धावांनी पराभव केला. यासह भारतीय संघाने या स्पर्धेत सलग तीन विजय मिळवले असून आपल्या गटात पहिले स्थान पटकावे आहे.

दुबईमध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या दरम्यान भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २४९ धावा केल्या. ज्यामध्ये श्रेयस अय्यरने शानदर ७९ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाकडून कर्णधार केन विल्यमसनने ८१ धावांची खेळी केली. केन विल्यमसनला १७ धावांवरच जीवनदान मिळाले होते. त्यामुळे टीम इंडियला ही विकेट्स खूप महागात पडेल असे वाटले होते.पण भारताचा फिरकीपटू अक्षर पटेल याने केन विल्यमसनला घरचा रस्ता दाखवला. दरम्यान आता एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

विराट कोहलीने पडल्या अक्षर पटेलच्या पाया

केन विल्यमसन ज्या लयात फलंदाजी करत होता तेव्हा न्यूझीलंड हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. यादरम्यान केन विल्यमसन ८१ धावांवर असताना अक्षर पटेल गोलंदाजी करण्यासाठी आला. यावेळी त्याने चकवणारा चेंडू टाकून त्याला घरचा रस्ता दाखवला. केन विल्यमसनला बाद केल्यानंतर विराट कोहली अक्षर पटेलकडे धावत गेला आणि भर मैदानात त्याचे पाया पडले. यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा